सामान्याकडून असामान्याकडे असा स्वयंसेवकांचा प्रवास एनएसएस मध्ये होतो –  प्रा. माणिक बाबर

रत्नागिरी : विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल करण्याची क्षमता राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उपक्रमांमध्ये आहे. त्यातून राष्ट्राप्रती समर्पित होऊन काम करणारी पिढी निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन प्रा. माणिक बाबर यांनी केले. अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना ‘स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्व विकासात एनएसएसचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी व पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर उपस्थित होते.

प्रा. बाबर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्थापने मागचा हेतू समजावून दिला. भारतात असणाऱ्या 35 लाख एनएसएस स्वयंसेवकांमध्ये आपण आहोत, याचा प्रत्येक स्वयंसेवकाने अभिमान बाळगावा. कमी वयात आपणाला समाजसेवेची संधी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे मिळते. पुढे आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मूळ उद्दिष्टांमध्ये काळानुसार बदल करून त्यामध्ये वर्तमान काळातील समस्यांवर काम करणे गरजेचे आहे यामध्ये मोबाईल एडिक्शन, वाहतूक समस्या, पालक मुलांमध्ये सुसंवाद, धार्मिक व जातीय सलोखा यावरती स्वयंसेवकांनी पथनाट्य, रॅली, परिसंवाद यांच्याद्वारे जनजागृती करावी असे सांगितले.

या वेळी राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण करण्यात आले.
बक्षीसपात्र विद्यार्थी पुढील प्रमाणे- रांगोळी स्पर्धा – प्रथम क्रमांक – हिंदवी किर, द्वितीय क्रमांक – पुजा गोरे, सुखदा गावकर, तृतीय क्रमांक – संतोषी दमाई, गौरी सावंत, उत्तेजनार्थ – हर्षा पाथरे, विदुला कुलकर्णी आणि दीक्षा तुळसणकर, सोनाली तुळसणकर.
चित्रकला स्पर्धा– प्रथम क्रमांक– समृद्धी कुळये, द्वितीय क्रमांक – चंदना खापरे, तृतीय क्रमांक – खुशी जाधव, उत्तेजनार्थ – रिया सुर्वे, सुखदा गावकर
वक्तृत्व स्पर्धा- प्रथम क्रमांक – विदुला कुलकर्णी, द्वितीय क्रमांक – स्वरा पाटणकर, तृतीय क्रमांक– पल्लवी डोंगरे.
एकपात्री अभिनय– प्रथम क्रमांक– सायली कोतापकर, द्वितीय क्रमांक– सेजल गोविलकर, तृतीय क्रमांक – शरणी सुवरे.
हस्ताक्षर स्पर्धा– प्रथम क्रमांक– समृद्धी कुळये, द्वितीय क्रमांक– सानिया दळवी, तृतीय क्रमांक– रिद्धी बाचरे, उत्तेजनार्थ– निशिता पवार, सोहम चव्हाण

सूत्रसंचालन विदुला कुलकर्णी हिने केले. मान्यवरांचा परिचय भूमी भागवत हिने करून दिला. राज लाड याने आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. स्मिता पाथरे, प्रा. अभिजीत भिडे, प्रा. स्नेहा बाणे यांनी प्रयत्न केले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांचे मार्गदर्शन लाभले.