रत्नागिरी : सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. कडधान्ये, डाळी महागल्याने त्या तुलनेत स्वस्त मिळणाऱ्या पालेभाज्यांना मागणी वाढली आहे. रत्नागिरी शहराच्यानजिक वायंगणी, कसोप, शिरगाव येथून येणाऱ्या पालेभाज्यांना मागणी वाढली आहे. या गावांतून लालमाठ, चवळी, मेथी, मुळा आदी भाज्या विक्रीसाठी आणल्या जात आहेत. या भाज्यांना मागणी वाढली आहे.