चिपळूण : शहरातील वीरेश्वर परिसरातील रस्ता खड्डेमय झाला असून, त्याकडे पालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. महामार्गापासून थेट बाजारपेठेकडे जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकामागील वीरेश्वर तलाव परिसरातील हा रस्ता रहदारीसाठी सोयीस्कर असल्याने कायम वर्दळ असते. पावसात या रस्त्यावर खड्डे पडले होते. राजकीय नेत्यांच्या दौऱ्यावेळी हे रस्ते खड्डेमुक्त झाले होते; मात्र त्यानंतर पुन्हा झालेल्या पावसात हा रस्ता उखडला आहे. सद्यःस्थितीत या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. न. प. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वारंवार खड्डे बुजवण्यापेक्षा पूर्ण नवीन रस्ता करावा, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 22/Nov/2024