राजापूरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम

राजापूर : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूर या मंडळाला ९९ वर्षे पूर्ण होऊन मंडळाने १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या मंडळाचे २०२४-२५ हे शताब्दी महोत्सवी वर्ष असणार आहे. या शताब्दी महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लोगोचे अनावरण करून होणार आहे. या लोगोचे अनावरण २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता मारुती मंदिर भटाळी येथे करण्यात येणार आहे. या शतक महोत्सवी वर्षानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूर यांच्या वतीने विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी ज्येष्ठ गणेशभक्तांच्या हस्ते लोगोचे अनावरण व लोकार्पण केले जाणार असून, यावेळी बडोदा येथील कीर्तनकार ह.भ.प. संकेत भोळे यांचे सार्वजनिक गणेशोत्सवाची गरज व उद्देश या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान होणार आहे. सर्व राजापूरकर गणेशभक्तांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूरचे अध्यक्ष मधुकर देवरूखकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 22/Nov/2024