रत्नागिरी : विधानसेसाठी गुरुवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या कामात शासकीय अधिकारी, कर्मचारी गुंतले होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे शासकीय कार्यालये उघडली असली तरी जिल्हा परिषद भवनात सन्नाटाच पहायला मिळाला. बहुसंख्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामाच्या ताणामुळे दांडी मारल्याचे पहायला मिळाले. यामुळे दिवसभर शुकशुकाट होता.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला आहे. निवडणुकीच्या कामात अधिकारी व कर्मचारी व्यस्थ असल्याने जिल्हाचे मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषद भवनात शुकशुकाट पसरला आहे. यामुळे नागरिकांच्या हि कामाचा खोळंबा होऊ लागला आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतर अनेक शासकीय कार्यालयांतील
कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक निवडणुकीच्या कामासाठी करण्यात आली आहे. या कालावधीत सर्व शासकीय योजना व विकासकामे बंद असल्याने शासकीय कार्यालयांमधील नागरिक व ठेकेदारांची वर्दळ घटली आहे. जिल्हा परिषदेतही हेच चित्र असून, आचारसंहिता लागल्यापासून सर्वच विभागांत शुकशुकाट आहे. आचारसंहितेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी झाल्याने त्यांच्या चेहर्यावर समाधानाचे वातावरण होते.
मात्र, कार्यालयीन कामकाजातून जराशी विश्रांती मिळते ना मिळते तोच निवडणूक कामासाठी आयोगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओर्डर काढल्या आहेत त्यामुळे या निवडणूक कामासाठी हे कर्मचारी हजर झाले होते.
बुधवारी जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडली, बहुसंख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. मतदान झाल्यानंतर मतपेटी पोचवण्यापर्यंत त्यांचे काम होते. रात्री उशीरापर्यंत हे काम सुरू होते. मात्र गुरुवारी कार्यालयाला सुट्टी नव्हती. यामुळे त्यांना गुरुवारी कार्यालयात हजर राहणे गरजेचे होते; परंतु या ताणामुळे अनेक कर्मचारी, अधिकार्यांनी गुरुवारी दांडी मारली. यामुळे जिल्हा परिषद भवनात गुरुवारी शुकशुकाटच पहायला मिळाला. सोमवारनंतरच जि.प. पुन्हा गजबजाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 22/Nov/2024