खेड : स्कूलगेम फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धा मध्य प्रदेश राज्यातील विधीशा येथे झाली. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विधी दीपक गोरे (इ. १० वी) हिने कांस्यपदक पटकावले.
यापूर्वी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात विधी गोरे हिने सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय तायक्वाँदो स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात आपली जागा निश्चित केली होती.
मध्य प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये संपूर्ण देशातील ३० राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. सदर राष्ट्रीय स्पर्धेत १८ राज्यातील खेळाडूंवर मात करत विधी गोरे हिने ६३ किलो वजनी गटामध्ये कांस्यपदक पटकावून तायक्वाँदो खेळातील आपले वर्चस्व सिद्ध केले. यशामुळे सर्वच स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिला क्रीडाशिक्षक व तालुका तायक्वांदो प्रशिक्षक चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे चेअरमन बिपीन पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूचे अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 22/Nov/2024