रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमात ‘विज्ञानातील संशोधन संधी’ या विषयावर डॉ. सर्फराज मुजावर यांचे व्याख्यान संपन्न झाले. शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी डी.बी.टी. स्टार महाविद्यालय या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि पदवीनंतरचे संशोधन तसेच इतर क्षेत्रांमध्ये कोणत्या करिअर संधी आहेत याविषयी त्यांनी माहिती
डॉ. मुजावर हे सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभिमत विद्यापीठामध्ये संशोधन आणि विकास विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. करियर आणि नोकरी या विभिन्न गोष्टी असून आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रयत्नपूर्वक काम केल्यास योग्य व्यवसाय अथवा नोकरी आपण मिळवू शकतो याविषयी प्रा. मुजावर यांनी संबोधन केले. नवीन तंत्रज्ञान निर्मिती मागे मूलभूत विज्ञानच असते असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले व या संबंधाने आपल्या अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचे दाखले त्यांनी दिले.
महाविद्यालयातील सुमारे १५० विद्यार्थांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. डॉ. विवेक भिडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. विभागप्रमुख डॉ. भूषण ढाले यांनी व्याख्यात्यांचा परिचय व उपक्रमाचे औचित्य सांगितले. विज्ञान विभाग उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी या उपक्रमाची आवश्यकता सांगत भविष्यातील संधीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यानी आतापासूनच योग्य प्रयत्न करावेत असे आवाहन केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 22/Nov/2024