चिपळूणमधील स्ट्राँग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच

चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदार संघात झालेल्या मतदानानंतर युनायटेड हायस्कूलमधील स्ट्रॉगरूममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या आहेत. या स्टाँगरुमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे ईव्हीएम अथवा स्टाँगरूमबाबत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी केले आहे.

गुरुवारी संध्याकाळी एका हॉटेलजवळ एका वॅगनार वाहनात चार व्यक्ती असल्याची तक्रार एका पक्षाच्या कार्यकत्यनि केली होती. या तक्रारीत त्या व्यक्ती छेडछाड अथवा जादूटोणा करण्याविषयी थांबले असल्याचे त्यांनी सांगितले होते. या तक्रारीनुसार पोलिसांनी त्या व्यक्तींना चौकशीला पोलिस ठाण्यात बोलविले. त्यांची चौकशी करून जबाब नोंदविला. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची संशयित वस्तू आढळलेली नाही. ते हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात आलेला होता. पोलिसांच्या सविस्तर चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलेले आहे.

स्ट्राँगरूमपासून दीडशे मीटर बाजूला मुंबई गोवा हायवे आहे. दोनशे मीटरवर गुहागर विजापूर हायवे आहे. या दोन्ही हायवे भागातील शंभर मीटर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. स्ट्रॉगरूमला दिलेली त्रिस्तरीय सुरक्षा कवच अभेद्य असल्याने ईव्हीएम तसेच स्ट्राँगरूमविषयी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाने म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:15 AM 23/Nov/2024