मुंबई : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला (Maharashtra District Vidhan Sabha Election 2024) यंदा एकाच टप्प्यात मतदान पार पडले. त्यानंतर आज 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होत आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीचा (Vidhansabha) निकाल हाती येत असून कोणाचं पारडं जड राहणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. अशात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून महत्त्वपूर्व पाऊल उचलण्यात आलंय. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षात याआधी पडलेली फूट लक्षात घेता आगामी काळात पुन्हा दगाफटका होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांकडून आधीच काळजी घेण्यात येत आहे.
निकालापूर्वी ठाकरे गट आणि शरद पवार गट अलर्ट मोडवर!
आज महाराष्ट्रातील विधानसभा निकाल जाहीर होत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत रंगली होती. दोन गटांमध्ये कोणाची सरशी होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शरद पवार गट अलर्ट मोडवर आहेत. निवडून आल्यानंतर आपण पक्षासोबतच राहू असं प्रतिज्ञापत्र पक्षातील सर्व उमेदवारांकडून घेण्यात आले आहे. पक्षात याआधी पडलेली फूट लक्षात घेता आगामी काळात पुन्हा दगाफटका होऊ नये यासाठी आधीच काळजी दोन्ही पक्षाकडून घेण्यात येत आहे.
उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्रं घेतली
निकाल लागल्यानंतर फोडाफोडी टाळण्यासाठी आणि दगाफटका टाळण्यासाठी तसेच निवडणूक झाल्यानंतर पक्षासोबतच राहणार, गेल्या दोन दिवसांत अशी प्रतिज्ञापत्र विद्यमान आमदारांसह उमेदवारांकडून लिहून घेतली आहेत. पक्षफुटीचा पूर्वीचा अनुभव पाहता ही सावधगिरी बाळगली जात आहे. मागील 2 दिवसांत सध्याच्या आमदारांव्यतिरिक्त निवडणुकीला सामोरे जात असलेल्या उमेदवारांकडून ही प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:26 23-11-2024













