रत्नागिरी : शहरातील निवखोल येथील उतारात रिक्षाचे पुढचे चाक निखळून झालेल्या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना शुक्रवार, २२ रोजी दुपारी २.३० वा. सुमारास घडली. रिक्षा चालक संदेश बोरकर (रा. चिंचखरी), अच्युत वासुदेव आगाशे ७०, बशीर अब्दूल रहिमान फणसोपकर ५९ (दोघेही रा. निवखोल, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी बशीर फणसोपकर हे आपल्या ताब्यातील दुचाकीवरुन सोबत आगाशे यांना घेऊन निवखोल येथे जात असताना निवखोलहून रत्नागिरीकडे येणारी रिक्षाचालक बोरकर हे निवखोल चढाव चढत असताना रिक्षाचे पुढचे चाक निखळले. त्याचवेळी रत्नागिरीहून निवखोल जाणाऱ्या दुचाकीस्वार रिक्षाच्या समोर आल्याने अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालक व दुचाकीवरिल दोघे असे तिघेजण जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. जखमी तिघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:40 AM 23/Nov/2024













