रत्नागिरी : मध्य रेल्वेच्या हद्दीत ठाणे तसेच दिव रेल्वे स्थानकादरम्यान टीडब्लूएस पाईंट बदलण्याच्या कामासाठी घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वेमार्गे धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस दोन दिवसांसाठी निर्धारित लोकमान्य टिळक टर्मिनस ऐवजी पनवेल स्थानकापर्यंतच धावणार आहे.
याबाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत ठाणे-दिवा दरम्यान रेल्वे मार्गावरील कामासाठी दि. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे तिरुअनंतरपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस (१६३४६) दरम्यान धावणारी दि. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रवास सुरू होणारी नेत्रावती एक्स्प्रेस पनवेललाच थांबवण्यात येईल. पनवेल ते लो. टिळक टर्मिनस दरम्यान या गाडीचा प्रवास रद्द केला जाईल.
याचबरोबर दि. २४ रोजी लो. टिळक टर्मिनस येथून तिरुअनंतरपुरमसाठी सुटणारी डाऊन नेत्रावती एक्स्प्रेस (१६३४५) लो. टिळक टर्मिनस ऐवजी पनवेल येथून पुढील प्रवासासाठी निघणार आहे. या दिवशी नेत्रावती एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:51 AM 23/Nov/2024













