दापोली : मतदानाच्या दिवशी आस्थापना बंद; नुकसान भरपाई देण्याची मागणी

दापोली : मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून १०० मीटर परिसरातील आस्थापने बंद ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयावरुन दापोलीतील सदर दिवसाच्या नुकसानीचा भत्ता अथवा भरपाई शासनाने देण्याबाबतचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांकडे दिले आहे.

मतदान केंद्रापासून शंभर मीटर परिसरातील आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्राजवळील दुकानदारांना पोलिस ठाणेकडून नोटीस पाठवून मतदानाच्या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी मतदान संपेपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचेही नमूद केले. याबाबत दापोली तालुका व्यापारी संघटना, दापोली व्यापारी महासंघ आणि जालगांव पंचक्रोशी व्यापारी असोसिएशनने निवडणूक निर्णय अधिकारी दापोली, निवडणूक निर्णय अधिकारी रत्नागिरी जिल्हा व मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना लेखी निवेदन सादर करून निवडणुकीच्या दिवशी संपूर्ण दिवस दुकाने बंद राहिल्याने त्या दिवसाची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मतदानाच्या दिवशी १०० मीटर परिसरातील दुकाने बंद ठेवण्यापेक्षा तेथे कोणताही गैरप्रकार आढळल्यास कारवाई करावी. प्रत्येक दोन दुकानात एक पोलिसरक्षक गर्दी जमू नये यासाठी नेमावा आदी उपाययोजनाही सुचवल्या आहेत. यावेळी मिलिंद शेठ, समीर फाटक, मयुरेश फाटक, किरण पेंडसे, महेंद्र शेठ, महेश साबळे, प्रशांत परांजपे, प्रसाद करमरकर, दिनेश जैन आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 23/Nov/2024