रत्नागिरी : वन्यप्राण्यांचा उपद्रवामुळे आणि पाण्याची समस्या यामुळे रब्बी हंगामातील लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी आहे; परंतु कृषी विभागाकडून रब्बी हंगामात जास्तीत जास्त क्षेत्रावर लागवडीसाठी कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ५०५९.८८ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मूग, भाजीपाला, वाल, कुळिथाचे बियाणे वितरित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगामातील भातासाठी हमीभाव मिळतो. रब्बीतील कोणत्याही पिकासाठी हमीभाव मिळत नाही. पाण्याची सुविधा नसल्यामुळे जिल्ह्यात अवघ्या पाच हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जात आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहित करताना वाल, कुळीथ, मूग, भाजीपाला बियाणांचे वाटप करण्यात आले. यावर्षी पाऊस दीर्घकाळ लांबला. त्यामुळे भातकापणी रखडली. परिणामी रब्बीतील पेरण्यांना विलंब झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 23/Nov/2024












