राजापूर : साने गुरुजी ग्रंथालयातर्फे २० डिसेंबरला कथाकथन स्पर्धा

राजापूर : तालुक्यातील कळसवली येथील साने गुरुजी ग्रंथालय, कळसवली व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, राजापूरतर्फे २० डिसेंबरला साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राजापूर-लांजा मर्यादित शालेय विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे.

कथाकथन स्पर्धा श्रीमती उमाताई शरद परूळकर माध्यमिक विद्यालय, वडवली येथे होतील. ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी या दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे. यावेळी कथा बोधपर असावी. लहान गटासाठी वेळ ३ ते ५ मिनिटे, मोठ्या गटासाठी ५ ते ७ मिनिटे दिली जाणार आहेत. शाळेमधून प्रत्येक गटातील एक स्पर्धक घेतला जाणार आहे. यावेळी शाळेचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे तसेच नावनोंदणी १५ डिसेंबरपर्यंत शरद साखळकर व वैभव ठाकूरदेसाई यांच्याकडे करावयाची आहे. यामधील मोठ्या गटातील प्रथम ३ क्रमांकांना १ हजार ५०१, १ हजार १ आणि ७०१ रुपये, तर लहान गटासाठी प्रथम ३ क्रमांकांसाठी १ हजार १ रुपये, ७०१ आणि ५०१ रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. बक्षीस वितरण त्याच दिवशी सायंकाळी ३ वा. आयोजित केले आहे. बाहेरून येणाऱ्या स्पर्धकांची दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.

तरी दोन्ही तालुक्यांतील शाळांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन साने गुरुजी ग्रंथालय, कळसवलीचे अध्यक्ष शरद साखळकर, कार्यवाह वैभव ठाकूरदेसाई, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, राजापूरचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर, कार्यवाह विनोद मिरगुले, श्रीमती उमाताई शरद परूळकर माध्यमिक विद्यालय, वडवलीचे मुख्याध्यापक प्रकाश साखळकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 23/Nov/2024