गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौद्धवाडी येथील धम्मचेतना बुद्ध विहारात २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भारतीय संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मालगुंड बौद्धवाडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १७ तथा बौद्ध ग्रामस्थ मंडळ यांचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान पुस्तिकेला अभिवादन करण्यात येणार असून भारतीय संविधानाची प्रस्तावना व प्रतिज्ञा ग्रहण केली जाणार आहे. तसेच धार्मिक पूजापाठाने महामानवांना अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी या कार्यक्रमात रत्नागिरी येथील त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी सत्यसागर यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन होणार आहे. हा कार्यक्रम मालगुंड येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १७ चे अध्यक्ष रविकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी शाखेचे पदाधिकारी व महिला मंडळ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला धम्म बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन येथील स्थानिक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 23/Nov/2024












