चांदोरमध्ये कांडर साप चावल्याने दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील चांदोर येथे कांडर जातीचा साप चावल्याने १० वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.१५ वा. सुमारास घडली. केतकी महादेव बारमोडे (१०, रा. नळीवाडी, चांदोर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन बालिकेचे नाव आहे.

सोमवारी सकाळी केतकी तिच्या घरात झोपलेली असताना तिला सापाने दंश केला. त्यामुळे ती जोरात ओरडल्यामुळे तिच्या नातेवाईकांना जाग आल्याने त्यांनी आजुबाजूला शोध घेतला असता त्यांना कांडर नावाचा साप दिसला. तिच्या नातेवाईकांनी तसेच शेजाऱ्यांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 26-09-2024