खेड : तालुक्यातील भडगाव येथील कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, माध्यमिक विभाग व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिर उच्च माध्यमिक विभाग या प्रशालेमध्ये शालांतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शन इयत्ता सहावी ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी या गटामध्ये भरविण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजकुमार मगदम यांच्याहस्ते करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहावी ते आठवी च्या गटातील प्रतिकृतींचे परीक्षण मनोज सुतार, सहा. शिक्षक, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे-बोरज व विजय शिंदे, सहा. शिक्षक, रामचंद्र धोंडशेट पाटणे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव यांनी केले. नववी ते बारावीच्या गटातील प्रतीकृतीचे परीक्षण समीर बाजे, सहायक शिक्षक, ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल मोरवंडे-बोरज व पंकज हलके, कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव यांनी केले. विद्यार्थ्यांची सृजनशीलता, कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी एकूण ५७ प्रतिकृती सादर केल्या होत्या. त्यामध्ये सहावी ते आठवीच्या गटातून सातवीतील समर्थ पन्नमवाड व सार्थक सचिन काणे या विद्यार्थ्यांच्या ‘वेस्ट मॅनेजमेंट’ या प्रतिकृतीचा प्रथम क्रमांक, सातवीतील संवेग भरत मरजे व अथर्व संतोष सुर्वे यांच्या पूर पातळी दर्शक या प्रतिकृतीचा द्वितीय क्रमांक तसेच सहावीतील श्रेया गणेश गीते व पूजा गोपीनाथ पवार याच्या ‘अन्न आरोग्य व स्वच्छता’ या प्रतिकृतीचा तृतीय क्रमांक व सातवीतील मनस्वी मंगेश वायकर व निधी सचिन पाटील या विद्यार्थ्यांच्या ‘अन्न आरोग्य व स्वच्छता’ या विषयावरील प्रतिकृतीचा उत्तेजनार्थ आहे.
नववी ते बारावीच्या गटातून अनुराग वाघमोडे व इंद्र पाटणे या विद्यार्थ्यांच्या ‘एलपीजी गळती दर्शक’ या प्रतिकृतीचा प्रथम क्रमांक, इयत्ता अकरावी विज्ञान जेईईमधील दुर्गेश प्रतापराव देसाई व ओम भागवत गीते या विद्यार्थ्यांच्या ‘सौर ड्रायर’ या प्रतिकृतीचा द्वितीय क्रमांक, इयत्ता अकरावी जेईईतील सुयश मोहन सोनावणे व अखिलेश बाबासाहेब तुंबरे या विद्यार्थ्यांच्या ‘घरगुती वजन मापक’ या प्रतिकृतीचा तृतीय क्रमांक तर ३.९ वी तील वेदा दिनेश शिरीषकर व अंतर अविश पाटील या विद्यार्थिनींच्या ‘कचरा व्यवस्थापन’ या प्रतिकृतीचा उत्तेजनार्थ क्रमांक आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद टेंबे, अश्विनी पाटील, रागिणी जामकर यांनी विशेष मेहनत घेतली.
सदर उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लढढा, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले व शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 23/Nov/2024














