कोकणची जबाबदारी समर्थपणे पेलली, उदय सामंत यांनी करून दाखवलं

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद भूषवणाऱ्या उदय सामंत यांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडत कोकणात महायुतीची जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे. आज झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग मधील 3 रत्नागिरीमध्ये 4 आणि रायगडमध्ये 3 म्हणजे एकूण 10 जागांवर विजय मिळवत आघाडीचा सुपडा साफ केलाय.

महायुतीच्या या यशात उद्योगमंत्री उदय सामंत यांचं योगदान अत्यंत मोलाचं असल्याचे बोललेल जातंय. उदय सामंत यांनी या तिनही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवले आहे. या काळात त्यांनी संघटनात्मक बांधणी आणि मित्रपक्षाशी समन्वय या दोन्ही गोष्टी यशस्वीपणे हाताळल्या होत्या. यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची कोकणातील पूर्ण जबाबदारी उदय सामंत यांच्यावर मोठ्या विश्वासाने टाकली होती. हा विश्वास सार्थ ठरवण्यात उदय सामंत यांना यश आलंय. कोकणातील एकूण 11 जगापैकी 10 जागा महायुतीने जिंकल्या आहेत, तर एकमेव जागा गुहागरची 2 हजाराच्या कोरकोळ मतांनी आघाडीकडे गेली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:17 23-11-2024