रत्नागिरी : फोडणीतला लसूण महाग झाला आहे. अगदी नॉनव्हेजपासून डाळीला देण्यासाठी ते तडका लसणीचा वापर होत असतो. मात्र दर भडकल्याने लसणाच्या फोडणीसाठी गृहिणी हात आखडता घेत आहेत.
तडक्यातून किंवा फोडणीतून लसूण गायब होणार आहे. याचे कारण म्हणजे लसणीचे दर कडाडले आहेत. आवक कमी झाल्याने लसूण, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर, घेवड्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. बऱ्याचशा भाज्या आणि लसणीची आवक ही परराज्यातून करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच त्याचे दर जास्त आहेत. इथे पिकांचे नुकसान होत असल्याने आवक कमी आहे आणि त्यात मागणी जास्त असल्याने भाज्यांचे दर वाढलेले पाहायला मिळाले.
सर्व पालेभाज्यांचे दर तेजीत अहोत. मागणी वाढल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, करडई आणि अंबाडी या पालेभाज्यांच्या दरात अल्पशी वाढ झाली. कांदापात, मुळा, राजगिरा, चाकवत, पुदिना, चवळी, पालकचे दर स्थिर आहेत.
भाजीपाल्याची आवक घटल्याने किमतीवर त्याचा परिणाम जाणवत असून बटाटा, कांद्यापाठोपाठ आता टोमॅटोचे दर वाढले आहेत. कांदा ४० ते ६० रुपये किलो आहे. बटाटा किरकोळ बाजारात ४० रुपये किलो, तर टोमॅटो न देखील ३० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. अवकाळीचा फटका, त्यात – वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने बाजार समित्यांमध्ये भाजीपाला पाठवणे परवडत नसल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. किरकोळ न बाजारात भाज्यांचे दर दुप्पटीने वाढल्याने गृहिणीचे आर्थिक बेजेट कोलमडले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:47 PM 27/Nov/2024









