नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांची रत्नागिरी खबरदार कार्यालयाला भेट

रत्नागिरी : राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी आज कोकणातील सर्वात मोठे सुपरफास्ट न्यूज नेटवर्क म्हणून ओळख असणाऱ्या दैनिक रत्नागिरी खबरदार च्या कार्यालयाला भेट दिली. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांचा पराभव करीत किरण सामंत हे राजापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. काल निकाल घोषित झाल्यावर रात्रीपर्यंत विजयी जल्लोष सुरू होता. आज सकाळी किरण सामंत हे मुंबईला रवाना होण्यापूर्वी त्यांनी रत्नागिरी खबरदार च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी रत्नागिरी खबरदार चे संपादक हेमंत व वणजु यांनी किरण सामंत याना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन देखील केले.