रत्नागिरी : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनाचे उद्घाटन सोमवारी दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पार पडणार आहे.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. रत्नागिरीकरांना चांगल्या वातावरणात योगाचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळावे यासाठी योगभवनाची वास्तू उपयोगी ठरणार आहे.
या योगभवनाच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना उत्तम योग ज्ञान देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 25-11-2024














