लांजा : आडवली ते तळवडे रस्त्याच्या दुतर्फा साफसफाई

रत्नागिरी : राजापूर लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक जाणिवेतून लांजा तालुक्यातील आडवली रेल्वेस्थानक ते तळवडे फाटा या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडून साफसफाई केली.

लांजा तालुक्यातील आडवली रेल्वेस्थानक ते तळवडे फाटा सुमारे १२०० मीटर लांबीचा मार्ग दुतर्फा उंच गवतामुळे झाकून गेला होता. त्यामुळे अपघातांची शक्यता होती. दोन दिवसांपूर्वी राजापूर लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. लाड आणि त्यांच्या संस्थेचे सदस्य शिक्षक महेंद्र साळवी यांनी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत व झाडी पाहिली. प्रवाशांना आणि वाहनांचा संभाव्य धोका त्यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेचच आरगावचे शेतकरी अमर खामकर यांच्याशी संपर्क साधला. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत दिवसभर उन्हातून तीन ग्रासकटिंग यंत्राच्या सहाय्याने कापून रस्ता सुस्थितीत केला.

श्री. लाड, श्री. साळवी, श्री. खामकर, विक्रांत खामकर, मारुती मोसमकर, दुपारच्या भोजनाची व्यवस्था करणाऱ्या सौ. सुनीता विनोद साळवी यांनी सामाजिक जाणिवेतून हे कार्य केले. त्याबद्दल आडवली ग्रामस्थांच्या वतीने विनोद बने यांनी त्यांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 25/Nov/2024