वायंगणी समुद्र किनारा स्वच्छता अभियान संपन्न

रत्नागिरी : तालुक्यातील वायंगणी समुद्र किनारा स्वच्छता अभियान दिनांक 24/11/2024 रोजी संपन्न झाले.

स्वच्छता अभियान डिजिटल स्टँडअप आणि ओंकार अग्रोटेकच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तालुक्यातील वायंगणी किनारा येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात रत्नागिरीच्या अनेक क्रिएटर्स व तरुण वर्गाने सहभागी होऊन आपला वाटा उचलला. निहार वैद्य आणि शिवांग साळवी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले, होते. तसेच वायंगणी ग्रामपंचायत यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. निहार वैद्य यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. या अभियानातून किनाऱ्यांची स्वच्छता राखणे आणि स्वच्छ पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा संदेश देण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 25-11-2024