रत्नागिरी : नाचणे, गणेश कॉलनी येथे घरफोड्या; ४ लाख ४२ हजारांचा ऐवज लंपास

रत्नागिरी : शहरातील श्रीराम नगर नाचणे आणि गणेश कॉलनी येथील दोन सदनिका फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा तब्बल ४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला.घरफोडीची ही घटना शनिवार २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते ४ वा. कालावधीत घडली आहे.

फिर्यादी महिला (३८,रा.श्रीराम नगर नाचणे, रत्नागिरी ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या कुटुंबियांसह बाहेर गेलेल्या असताना अज्ञाताने त्यांच्या सदनिकेच्या दरवाजाची कडी‚कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ३ लाख ५९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यानंतर चोरट्याने गणेश कॉलनीकडे आपला मोर्चा वळवत येथील नागेश गजबार (२९) यांची सदनिका फोडून ८२ हजार ५०० रुपयांचा असा दोन्ही ठिकाणचा एकूण ४ लाख ४१ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञाता विरोधात शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (अ),३३१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीत झाला चोरटा कैद
या दोन सदनिका फोडणारा चोरटा तेथील
सीसीटीव्हीत दिसून येत आहे. त्याची उंची ५.५ फूट असून रंग सावळा, दाढी मिशी, अंगात काळ्या रंगाचे टोपी असलेले फुल टीशर्ट, नेसणीस राखाडी रंगाची फुल जीन्स आणि पायात काळ्या चप्पल आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 25/Nov/2024