गुहागर किनाऱ्यावरून अमूर ससाणा ५ दिवसांनी सोमालियात पोहोचल्याची नोंद

रत्नागिरी : उपग्रहाद्वारे टॅग केलेल्या दोन अमूर ससाण्यापैकी एकाने गुहागर समुद्र किनाऱ्यावरून हवेत झेप घेतली. तो तब्बल ५ दिवस १७ तासांच्या अथक प्रवासानंतर अरबी समुद्रातून पार सोमालियात मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्याची नोंद झाली आहे.

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, अमूर ससाण्याला संरक्षित पक्षी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. हे पक्षी आग्नेय आशिया आणि ईशान्य चीन यामध्ये प्रजननाच्या ठिकाणी उन्हाळ्याचा ऋतू घालवतात. हे पक्षी आफ्रिकेतील मैदानांवर हिवाळ्यात राहणे पसंत करतात. या पक्ष्यांच्या परतीचा प्रवास एप्रिल-मेमध्ये अफगाणिस्तान आणि पूर्व आशियामधून सुरू होतो. सुमार २० हजार किलोमीटरचा वार्षिक प्रवास हे पक्षी करतात. ते भारताच्या ईशान्य क्षेत्रात तसेच सोमालियामध्ये थांबतात. मणिपूरच्या तामेंगलांग जिल्ह्यातील एका गावाच्या नावे दोन अमूर ससाणा पक्ष्यांना उपग्राहाद्वारे टॅग करण्यात आले. स्थलांतरांच्या मार्गावर वाईल्ड लाईफ इन्स्टियूड ऑफ इंडिया ही संस्था लक्ष देत ठेवत असते. या संस्थेचे शास्त्रज्ञ सुरेश कुमार म्हणाले, चिअलिआन दोनने रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे विनाथांबा प्रवास सुरू केला. हा पक्षी सोमालिया येथे पोहोचला. स्थलांतरित पक्ष्यांचा मार्ग आणि तामिंगलॉगमधील पर्यावरणीय बाबींचा अभ्यास करण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. चिअलिआन आणि वाँगग्राम ही तामिंगलॉग जिल्ह्यातील अमूर ससाण्यांची मुक्कामांची गावे आहेत. मणिपूर वनविभागाने ८ नोव्हेंबरला आणखी ९ अमूर ससाणा पक्षी सोडले. १९१८ मध्ये रेडिओ टॅगिंगया प्रकल्प पहिल्यांदा हाती घेण्यात आला. २०१९ मध्ये ५ पक्ष्यांना असे टॅगिंग करण्यात आले होते. कबुतराच्या आकाराचे असलेले हे पक्षी नागालँड, मणिपूरसह ईशान्य भारतात ऑक्टोबरमध्ये येतात. आफ्रिकेत जाण्यासाठी पुरेसे अन मिळाल्यानंतर ते नोव्हेंबरमध्ये हा प्रदेश सोडतात

२ अमूर ससाण्यांना रेडिओ टॅग
मणिपूर वनविभागाच्या वन्यजीव संस्था व रहिवाशांनी ८ नोव्हेंबरला दोन अमूर ससाण्यांना रेडिओ टॅग केले. हे जगातील सर्वांत लांब प्रवास करणारे पक्षी आहेत. उपग्रह टॅग असलेली आणखी एक अमूर ससाणा निरीक्षणाखाली आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 25/Nov/2024