दापोली : निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोलेंना पोर्ट्रेटने मानवंदना

साखरपा : निवडणूक आणि निकाल प्रक्रिया संपली असली तरी ही प्रक्रिया सक्षमपणे राबवलेले अधिकारी कायम लक्षात राहतात. दापोली येथील प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले हे अशांपैकीच एक त्यांना एका निवडणूक केंद्राधिकाऱ्यांनी अनोखी मानवंदना दिली आहे.

नाणीज येथील महाविद्यालयाचे कलाशिक्षक सौरभ कनावजे हे दापोली येथील मतदान केंद्रावर केंद्राधिकारी म्हणून कार्यरत होते. या विभाग दापोली प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या अखत्यारित येतो. तेथे त्यांनी अत्यंत कार्यक्षमपणे सर्व नियोजन केले होते. निवडणूक साहित्य वाटप, निवडणूक केंद्र अधिकाऱ्यांना केलेले मार्गदर्शन, एसटी बसेसची व्यवस्था, निवडणुकीनंतर साहित्य जमा करून घेण्यासाठी केलेले नियोजन, कर्मचाऱ्यांची नाश्ता आणि भोजन व्यवस्था यामुळे डॉ. थोरबोले हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून समोर आले. त्यांचा प्रभाव केंद्राधिकारी म्हणून काम पहात असलेल्या कनावजे यांच्यावर पडला. सौरभ कनावजे हे चित्रकार असल्याने त्यांनी त्यांच्या कलेतून थोरबोले यांना मानवंदना दिली आहे. कनावजे यांनी थोरबोले यांचे पोर्ट्रेट साकारत डॉ. थोरबोले यांच्या नियोजनाविषयी आदर व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 25/Nov/2024