रत्नागिरी : फळपीक विमा योजनेत सहभागी नसाल तर बँकेला कळविणे अनिवार्य

रत्नागिरी : फळपीक विमा योजनेसाठी ३० नोव्हेंबर अंतिम मुदत देण्यात आली असताना या योजनेच्या निकषाबाबत बागायतदारांत संद्धिग्धता आहे. अंतिम मुदतीच्या आधी आठ दिवस जर विमा योजनेत सहभाग घ्यायचा नसेल तर बँकेला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना आपल्या फळशेतीचा हवामानावर आधारित पीक विमा काढावयाचा आहे, अशांनी कर्ज घेतलेल्या बँकेशी संपर्क साधून आपल्या आंबा, काजू फळबागेचा पीक विमा काढावयाचा आहे किंवा नाही, याबाबत बँकेला फॉर्म भरून देणे अनिवार्य आहे. जे शेतकरी कोणत्याही बँकेचे कर्जदार नाहीत, परंतु त्या शेतकऱ्यांना पीक विमा काढावयाचा या वर्षीच्या हवामानावर आधारित आहे त्यांनी जवळील सीएससी पीक विमा अॅग्रीकल्चर विमा कंपनी, सेंटर किंवा शाखेशी संपर्क साधून यांच्यातर्फे विमा काढला जाणार आहे. काजूसाठी संरक्षित रक्कम १,२०,००० आहे. पर्यंत तर आंब्यासाठी १,७०,००० पर्यंत बँक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी आहे. दोन्ही पिकांचा विमा घेण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२४ आहे. विमा संरक्षण प्रति शेतकरी जास्तीत जास्त ४ हेक्टरपर्यंत मिळेल. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आंबा – काजू बागायतदार शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित पीक विमा योजना २०२४-२५ चा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 25/Nov/2024