खेडमध्ये जलवाहिन्या दुरुस्तीसाठी पुन्हा रस्ते खोदकाम सुरू

खेड : खेड नगरपरिषद हद्दीतील जुनाट जलवाहिन्यांमध्ये पुन्हा बिघाडाचे सत्र सुरू झाले आहे. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी खोदाईचा पुन्हा प्रकार पुन्हा सुरू झाल्याने मार्गाची अवस्था बिकट होत आहे. आधीच नगर परिषद हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली असताना त्यात खोदाईचीही भर पडली आहे.

खोदलेला भाग पूर्णपणे बुजवण्याची तसदी घेतली जात नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. नगरपरिषद हद्दीतील बहुतांश ग्राहकांना दिलेल्या जलवाहिन्या खूपच जुनाट आहेत. या जुनाट जलवाहिन्या नागरिकांकडून तक्रारी केल्यानंतर बदलण्याची तसदी अद्यापही नगरप्रशासनाने घेतलेली नाही. जलवाहिन्यांमध्ये सातत्याने बिघाड होवून पाणीप्रश्न उभा ठाकला आहे. खोदलेल्या भागावर मलमपट्टी करण्याचा प्रकार सुरू आहे. नुकतीच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जलवाहिनीतील बिघाड दूर करण्यासाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत खोदाई करण्यात आली. खोदलेला खड्डा काही तास तसाच ठेवण्यात आल्याने काही वाहनचालकांची फसगतही झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 25/Nov/2024