दापोली : नुकत्याच सुरू झालेल्या थंडीच्या हंगामात दापोलीतील समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिनचे दर्शन घडू लागले आहे. डॉल्फिनसाठी हा प्रजनन काळ असल्याने येथील किनारी डॉल्फिन सहज पाहायला मिळत आहेत. सध्या पर्यटकांसाठी येथील समुद्रात विहार करताना दिसणारे डॉल्फिन ही पर्वणी ठरत आहे.
दापोलीतील समुद्रकिनारी डॉल्फिनच्या जलविहार दरम्यानच्या कसरती पाहण्यासाठी सध्याचा कालावधी अतिशय योग्य मानला जातो. जास्तीत-जास्त पर्यटकांनी या ठिकाणी येऊन डॉल्फिन दर्शनाचा आनंद घ्यावा, अशी स्थिती आहे. दापोलीतील तालुक्यात डॉल्फिन पाहण्यासाठी लाडघर बीच, कर्दे बीच, मुरुड बीच, पाळंदे बीच तसेच आंजर्ले हे किनारे किनारे प्रसिद्ध आहेत. या पर्यटक खास डॉल्फिनचा जलविहार आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी येऊ लागले आहेत.
दापोली समुद्र किनारा ‘डॉल्फिन पॉईंट’ म्हणून प्रसिद्ध आहे. दूरदूरचे पर्यटक खास डॉल्फिनच्या कसरती अनुभवण्यासाठी येतात. त्यामुळे दापोलीच्या पर्यटनात भर पडते. याचा फायदा आपोआप येथील व्यावसायिकांना होत आहे. -विद्यमान गुरव, पर्यावरणप्रेमी-जालगाव-दापोली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 25/Nov/2024














