रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नवे उमेदवार किरण सामंत 80 हजार 256 मते मिळवून विजयी झाले. त्यांच्या रूपाने राजापूर मतदारसंघाला नवा चेहरा मिळाला आहे.
सामंत यांनी यापूर्वी तीन वेळा आमदार असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन प्रभाकर साळवी यांचा 19 हजार 677 मतांनी पराभव केला. साळवी यांना 60 हजार 579 मते मिळाली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश शांताराम लाड यांनी अपक्ष म्हणून राजापूरमधून निवडणूक लढविली होती. त्यांना 7945 मते मिळाली. गेल्या वेळच्या निवडणुकीत लाड यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांना 53 हजार 557 मते मिळाली होती. आणखी एक अपक्ष उमेदवार संजय आत्माराम यादव ऊर्फ यादवराव यांना यावेळी 372 मते मिळाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी राजापूरमधून 2014 साली निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना 9953 मते मिळाली होती. पूर्वी पक्षातून आणि आता अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला मतदार मते देत नाहीत, हे यावरून स्पष्ट झाले.
राजापूर मतदारसंघातील अन्य उमेदवार, त्यांचे पक्ष आणि त्यांना मिळालेली मते अशी –
अमृत तांबडे – अपक्ष – 1204.
राजेंद्र रवींद्रनाथ साळवी – अपक्ष – 1074.
संदीप विश्राम जाधव- बहुजन समाज पार्टी – 1065.
यशवंत रामचंद्र हर्याण – अपक्ष- 286.
नोटा – 1834.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 25-11-2024














