जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीमार्फत दरवर्षी देण्यात येणारा मानाचा आणि प्रतिष्ठेचा कै. सदानंद बळीराम परकर स्मृती जिल्हास्तरीय पुरस्कार २०२४ साठी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी आपले प्रस्ताव योग्य नमुन्यात पाठविण्याचे आवाहन मालगुंड एज्युकेशन सोसायटीमार्फत करण्यात आले आहे. मालगुंड एज्युकेशन सोसायटीमार्फत प्रत्येक वर्षी
जिल्ह्यातील एका शिक्षकाची या पुरस्कारासाठी निवड केली जाते आणि त्या शिक्षकाला रोख रुपये पाच हजार, सन्मानचिन्ह, शाल देऊन सन्मानित करण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी आपले प्रस्ताव योग्य नमुन्यात मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे सचिव विनायक राऊत यांच्याकडे मंगळवार दि. १० डिसेंबरपर्यंत पाठवण्याचे आवाहन मालगुंड एज्युकेशन सोसायटीमार्फत करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 25/Nov/2024














