खेड आगारातून मुंबईसाठी जादा शिवशाही बस

खेड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी गावी आलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी येथील एसटी प्रशासनाने बुधवारी रात्री जादा खेड-मुंबई शिवशाही बस फेरी सोडल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. रात्री १०.३० वाजता येथील बसस्थानकातून बस मार्गस्थ झाली. या बस फेरीमुळे मतदानासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यास मदत झाली. तसेच अन्य गाड्यांना होणारी गर्दीची तीव्रता कमी होण्यासदेखील तितकीच मदत झाल्याने अन्य प्रवाशांनीही सुटकेचा निःश्वास टाकला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 25/Nov/2024