Badlapur Encounter: अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणारे दोन पोलिस अधिकारी खेडचे

खेड : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर झाला. ज्या पोलिस मोटारीतून त्याला तळोजा येथून बदलापूर येथे तपासकामासाठी नेण्यात येत होते, त्याचदरम्यान अक्षय शिंदे याने पोलिस व्हॅनमध्ये गोंधळ घालून पोलिस अधिकाऱ्यांचेच रिव्हॉल्वर काढून त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तर म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या बंदुकीतून झाडलेल्या गोळीमुळे अक्षय शिंदे यमसदनी गेला. ते दोन्ही पोलिस जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आहेत.

या एन्काउंटरमध्ये गंभीर जखमी झालेले सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे हे खेड तालुक्यातील अस्तान या गावातील असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे खेड तालुक्यातील खोपी या गावातील आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 26/Sep/2024