रत्नागिरी : जिल्ह्यातील मच्छिमार नौकांची व्यापक तपासणी मोहीम पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील १४७३ यांत्रिकी नौकांच्या पैकी ११६४ नाकाधारकांकडे यथायोग्य दस्तऐवज तसेच नौका आढळून आल्या. मात्र ३०९ नौकाधारकांकडे योग्य बाबी आढळल्या नाहीत. म्हणून अशा नौकांना डिझेल परतावा यादीतून वगळण्यात आले आहे. प्रभारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच डिझेल नौकांची पडताळणी सुरू केली.
ठिकठिकाणी परवाना अधिकार्यांनी बंदरावर गस्त घालून तपासणी मोहिमेत भाग घेतला. मच्छिमार नौकेचे नोंदणी प्रमाणपत्र, मासेमारी व बंदर परवान्यासह अनेक बाबींची पडताळणी करण्यात आली. यामध्ये वैध कागदपत्रे तसेच नौकेची रास्त परिस्थिती लक्षात घेवून प्रमाणीकरण करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात १४७३ डिझेल यांत्रिकी नौका असून त्यापैकी ११६४ नौकांकडे सार्या बाबी यथायोग्य आढळल्याने त्यांना शासनाकडून येणारा डिझेल परतावा देय ठरवण्यात आला. ३०९ नौकाधारकांकडे वैध कागदपत्र अथवा नौकेशी योग्य परिस्थिती न आढळल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. पडताळणीमुळे ही कार्यवाही शक्य झाली, अशी माहिती प्रभारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 25/Nov/2024














