लांजा : लोकमान्य वाचनालय लांजा या संस्थेचे वतीने रविवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता तालुका मर्यादित खास महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी पुस्तकः वणव्यामध्ये गारव्यासारखे, सोशल मिडीया आणि आजची तरुणी, मानवी नात्यातील हरवत जाणारा ओलावा, मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा आणि आपले कर्तव्य आणि स्त्री आरोग्य मानसिक आणि शारीरिक हे विषय ठेवण्यात आले आहेत.
वक्तृत्व स्पर्धा रविवार दि.८ डिसेंबर रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता वाचनालयाचे सभागृहामध्ये सुरु होणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांनी आपली नावे दि.५ डिसेंबर पर्यत नोंदवायची आहेत. अधिक माहितीसाठी संचालिका सौ. विजयालक्ष्मी देवगोजी मो. ९९७०५६७६३२अथवा संचालिका सौ. ललिता भिंगे मो. ९४२३२९५३९८ किंवा वाचनालयाचे कार्यालयात संपर्क करावयाचा आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला रोख १५००/- प्रशस्तीपत्र, व्दितीय क्रमांकाला रोख १२००/- प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक-रोख १०००/- प्रशस्तीपत्र आणि उत्तेजनार्थ क्रमांक दोन रोख ५००/- प्रशस्तीपत्र अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
सदर स्पर्धेत लांजा तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. अभिजीत जेधे, उपाध्यक्ष योगेश वाघधरे, कार्यवाह उमेश केसरकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:25 PM 25/Nov/2024














