रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथून भक्तगणांचे मनोरथ सिध्द करणारी गावखडी ते अक्कलकोट मनोरथपूर्ती महापदयात्रा प्रतिवर्षी प्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ, गावखडी मठाधिपती श्री सद्गुरू दास दिगंबर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र गावखडी ते श्री क्षेत्र अक्कलकोट २ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. पदयात्रचे हे १९ वे वर्ष आहे.
पदयात्रा मार्गक्रमण असा आहे :
पदयात्रा मार्ग – दुपारी विश्रांती व रात्री निवास याप्रमाणे –
दि. २ डिसेंबर – गावखडी मठ प्रारंभ दु. ४ वा. निवास – गोळप
दि. ३ डिसेंबर- रत्नागिरी, हातखंबा
दि. ४ डिसेंबर- नाणिज, करंजारी
दि. ५ डिसेंबर- दाभोळे, साखरपा
दि. ६ डिसेंबर – आंबा, मलकापूर
दि. ७ डिसेंबर- बांबवडे, पैजारवाडी
दि. ८ डिसेंबर- कोल्हापुर (पंचगंगा नदी काठ), कोल्हापूर
दि. ९ डिसेंबर- हातकणंगले, जयसिंगपूर
दि. १० डिसेंबर- मिरज, भोसेगाव
दि. ११ डिसेंबर- कुची, शेळकेवाडी
दि. १२ डिसेंबर- जुनोनी, पाचेगाव
दि. १३ डिसेंबर- सांगोला, आंधळगाव
दि. १४ डिसेंबर- गणेशवाडी, माचणुर
दि. १५ डिसेंबर- सोहाळे, थोरली कामती
दि. १६ डिसेंबर- तीऱ्हे, सोलापूर
दि. १७ डिसेंबर- कुंभारी, तोगराळी
दि. १८ डिसेंबर- कोन्हाळी, कोन्हाळी
दि. १९ डिसेंबर- अक्कलकोट
दि. २० डिसेंबर- गावखडी सांयकाळी
दि. २१ डिसेंबर श्री स्वामी समर्थ मठ गावखडी येथे श्री स्वामी पादुकांना मंगलस्नान, पूजन, महाआरती, महाप्रसाद या पदयात्रेमध्ये प्रवेश व सहभाग विनामूल्य आहे. इच्छुक श्री स्वामीभक्तांनी पदयात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ, गावखडी यांच्याकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 25/Nov/2024














