रत्नागिरी : जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा उत्साहात

पावस : जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा रत्नागिरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहात झाल्या. स्पर्धेमध्ये रत्नागिरी, खेड, चिपळूण, लांजा, दापोली, गुहागर, संगमेश्वर या तालुक्यातील कराटे खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी १३० कराटे मुला-मुलींनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उ‌द्घाटन क्रीडा अधिकारी गणेश जगताप सर यांच्या हस्ते झाले. या वेळी रत्नागिरी तालुक्यातील कराटे प्रशिक्षक अरुण बेग, सूरज बने, खेडचे दीपक कदम, गुहागरच्या डॉ. योगिता खाडे, लांजाचे श्री. हटकर, संगमेश्वरचे तेजस साळुंखे, तसेच सहायक प्रशिक्षक व क्रीडाशिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.

त्याचा निकाल अनुक्रमे असा
१४ वर्षाखालील मुले वजन गट (२०ते २५) दूर्वाक बंडबे, पृथ्वीराज डांगे, २५ ते ३० किलो स्वर सुबरे, ताईब तन जिम माहीमकर, जयसिंग मनोज सिंग चौधरी, राम राऊत, ३० ते ३५ किलो श्रवण जोध, गौरीज बने, अर्णव जोशी, शौर्य पवार, ३५ ते ४० किलो- स्पंदन संकेत लिंगायत, आरुप लेंडे, प्रतीक मोगरे, हर्ष शेलार ४० ते ४५ किलो-रोमित घोसाळे, वेदांत देवाडीगा, आदित्य नारकर, मयुरेश राजपूत. ४५ से ५० किलो आयुष सावंत, अर्णव जोगळेकर, रोहन साळुंखे, खुशियाल गुप्ता. ५० ते ५५ किलो ऋग्वेद दामले, गोपाळ परब, मोहम्मद अली अब्बास बरमारे, पार्थ पाटील, ५५ ते ६० किलो अथर्व आखाडे, सोहम कुबल, ६० किलोवरील अनिकेत गोरे.

१४ वर्षाखालील मुली २६ ते ३० किलो संस्कृती कोकरे, रानया भोसले. ३० से ३४ किलो हेमांगी मेंदे, पूर्वा मोरे, सोना जाधव, खुशी खेत्री. ३४ ते ३८ किलो- मनस्वी कुड, पूर्वी शिंदे, ३८ ते ४२ किलो- उत्कर्षा पाटील, राजलक्ष्मी पवार, अनुष्का सिंग चौधरी, मुस्कान नजरुल इस्लाम, ४२ ते ४६ किलो मोहिनी डांगे, सिद्धी चव्हाण, ४६ ते ५० किलो सावरी राठोड, वारीजा कांबळी. ५० किलोवरील खुशी हटकर, सानिका पवार, दूर्वा पवार, तीर्था भोगले.

१७ वर्षाखालील मुले ३५ ते ४० किलो अथर्व मोरे, राज जानकर. ४० ते ४५ किलो प्रथमेश वाघमोडे, ४५ ते ५० किली महेश वाघमारे, साईराज गुरव, नरेद बाशीद हर्च्रीकर सागर कुमार भगाराम माळी. ५० से ५४ किलो- शुभम भंडारे, रुद्र खरडे, सौमित्र रेगे, निशांत साळुंखे ५४ ते ५८ किलो ध्रुव बसणकर, सार्थक हटकर, पार्थ घोगरे, ५८ ते ६२ ईशान बोधले. ६२ ते ६६- जैद सिद्धी अनवारे, धनुष देवाडिगा, श्लोक सावंत. ६६ ते ७० किलो आरीज तोफिक मुजावर, कौस्तुभ बने. ७० ते ७४ किलो ओम जगताप. ७८ ते ८२ किलो आशीर्वाद कबनूरकर,

१७ वर्षे खालील मुली ३२ ते ३६ किलो कार्तिकी झोरे. ३६ ते ४० किलो रिया माचकर, श्रेया चव्हाण, आदिती कांबळे ४० ते ४४ किलो- मनस्वी कारेकर.

४४ ते ४८ किलो- वैष्णवी तांबे, अंतरा सावंत, देवयानी देचकर. ४८ ते ५२ किलो श्रद्धा निकम, सलोनी राठोड, संचिता हटकर, वैष्णवी अंजरलेकर. ५२ ते ५६ किलो मंजिरी जानवलकर. ६८ किलोवरील पायल मावेनुर, श्रवणी गांगण, सानवी जाधव, ९ वर्षाखालील मुली ५६ ते ६० किलो श्वेता खानविलकर, ६८ किलोवरील दूर्वा मयेकर, १९ वर्षांखालील मुले ४० ते ४५ किलो सुजल यादव, ५० से ५४ किलो ओमकार देवळेकर, ५८ ते ६२ किलो वंश तांबे, ६६ ते ७० किलो-जप शिर्के, ८२ किलोवरील प्रेम बेग,

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 25/Nov/2024