रत्नागिरी : समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कुवारबाव येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार कार्यक्रमाचे पाहुणे आहेत. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 26-11-2024














