रत्नागिरी : राज्य नाट्य स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत मराठी रंगभूमी समृद्ध करण्याकरिता विविध उपक्रम राबवत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची गौरवसंपन्न वाटचाल ६२ वर्षे अविरत चालू आहे. ज्याद्वारे अनेक नाटककार अभिनेते, तंत्रज्ञ, दिग्दर्शक निर्माण झाले आहेत. त्यांनी नवनवीन प्रयोग करुन या उपक्रमास व मराठी रंगभूमीस समृद्ध करून वैश्विक स्तर प्राप्त करून दिला आहे. यावर्षीच्या त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी २४ नोव्हेंबरपासून राज्यातील विविध २४ जिल्हास्तरावरील केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरीतील स्पर्धा २६ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे.
या स्पर्धेमध्ये सादर होणारी नाटके अशी – मंगळवारस २६ नोव्हेंबर सायंकाळी ७ वाजता आजीचा बॉयफ्रेंड, बुधवार २७ नोव्हेंबर सायंकाळी ७ वाजता मॉर्फोसिस, गुरुवार २८ नोव्हेंबर सायंकाळी ७ वाजता अखेरचा सवाल, शुक्रवार २९ नोव्हेंबर सायंकाळी ७ वाजता रुक्ष, शनिवार ३० नोव्हेंबर सायंकाळी ७ वाजता जब वी मेट. रविवार १ डिसेंबर सायंकाळी ७ वाजता महानायक. सोमवार २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता चांदणी, मंगळवार ३ डिसेंबर सायंकाळी ७ वाजता कडीपत्ता. बुधवार ४ डिसेंबर सायंकाळी ७ वाजता स्वप्नपक्षी.
नाट्यप्रेमीनी मोठ्या संख्येने नाटकांना उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 26-11-2024














