खेड : बहिरवली येथे अपघातात ६ महिलांसह रिक्षाचालक जखमी

खेड : तालुक्यातील बहिरवली फाट्याजवळ रविवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात ६ महिलांसह रिक्षाचालक जखमी झाला आहे. त्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संतोष गायकवाड हा रिक्षा चालक भाडे घेऊन निघाला होता. तो रिक्षाने ६ महिलांना नेत असताना एका कारने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही घटना रात्री ११.३० च्या सुमारास घडली. कारचा चालक रवींद्र भांदिगरे हा भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याने हा अपघात झाला, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या अपघातात रिक्षा आणि कार दोन्हींचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी महिलांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 26/Nov/2024