कोकण किनारपट्टीवर आठवडाभर थंडी

रत्नागिरी : उत्तरेकडील शीतलहरींनी आता कोकणकिनारपट्टीचा ताबा घ्यायला सुरवात केली आहे. त्यामुळे कोकणात बऱ्यापैकी थंडीचा माहोल सुरू झाला आहे. कमाल आणि किमान तापमानही घट झाल्याने रात्रीही गारठा जाणवू लागला आहे. हा आठवडा किनारपट्टी भागात थंडीचा प्रभाव राहणार असून तापमानातही घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण आणि दुर्गम भागात थंडीचा प्रभहाव जाणवू लागला आहे. सोमवारी सकाळी रत्नागिरी शहर आणि परिसरात कमाल तापमान आर्द्रतेसह २८ अंश सेल्सिअस एवढा नोदविले गेले तर पहाटेही तापमानात कमालीची घट झाल्याने हुडहुडी भरविणारी थंडी पडली होती. सकाळी दहानंतर तापमानाने काही अंशी उचल घेतली तरी गारठा कायम होता. नोव्हेंबर अखेरीस बऱ्यापैकी थंडी पडू लागल्याने बागायतदरांमध्ये समाधान आहे. तापमानात उतार पडल्याने आंबा आणि काजूवर मोहोर प्रक्रिया सुरू होणारा आहे. त्यासाठी बागायतदारांनी थंडीचा अंदाज घेत फवारणीची तयारी सुरू केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 26/Nov/2024