रत्नागिरी : शेतीमालामध्ये आंबा पिकाचा समावेश व्हावा, तशी मागणी कोकणातील बागायतदारांनी केली होती. त्यानुसार आंब्याचा शेतमालात समावेश करण्याची प्राथमिक तयारी करण्यात आली आहे. आंब्याचे फळमाशी आणि माकडापासून मोठे नुकसान होते. त्याबाबत नुकसानभरपाई दिली जाईल. त्यासाठी कोकणच्या राजाला बेगमीपासून ते निर्यातीपर्यंत संरक्षण देण्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. शेतीमालामध्ये आंबा पिकाचा समावेश व्हावा, यासाठी दोन्ही जिल्ह्यातील वागायतदारांच्या संयुक्त संघटनेतर्फे मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आंब्याचा शेतमालात समावेश करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आंब्यावर फळमाशी पडून मोठे नुकसान होते. त्याबाबत नुकसान भरपाई दिली जाईल. माकडापासून होणाऱ्या नुकसानीवरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. आंबाफळाच्या सुरुवातीपासून ते निर्यातीपर्यंत संरक्षण देण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आंबा मंडळाच्या प्राथमिक प्रक्रियेत हे मुद्दे बोर्डाच्या अजेंड्यावर राहणार आहेत. पाच वर्षांपूर्वीच्या काजू आणि आंबा बोर्डालाही मोठा निधी मंजूर झाला होता. त्याचे काम सुरू आहे; परंतु आता आंब्यासाठी हे स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदाराला मोठा दिलासा मिळणार आहे. आंबा बोर्डामुळे कोकणातील बागायतदारांना औषधांसह बागांच्या देखभालीसाठी आवश्यक साहित्य खरेदीला अनुदान मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 26/Nov/2024














