रत्नागिरी : नैसर्गिक स्रोताचा वापर करून शेतकऱ्यांना अखंड व शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी सौर कृषी पंप योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. सौरपंप बसविण्यासाठी येणारा खर्च अधिक असला तरी त्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यात फळबाग लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे.
फळबागेसाठी पाणीपुरवठा आवश्यक असून, त्यासाठी सौरकृषी पंप फायदेशीर ठरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा दरमहा वीज बिलाचा येणारा खर्च कमी झाला आहे. पावसाळ्यातील चार महिने सौर पंपासाठी प्रेशर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे प्रस्ताव देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. सौरपंपामुळे शेतकऱ्यांचे वीज बिलाचे पैसे वाचणार असून, विजेचीही बचत होणार आहे. सौर कृषी पंप बसविण्यासाठी खर्च अधिक येत असला तरी शेतकऱ्यांना अनुदान मिळत असल्याने या योजनेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. सध्या महावितरणकडील सौर कृषी पंप वितरण बंद असले तरी महाऊर्जाकडून मात्र सुरु आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच सौर कृषी पंपासाठी मान्यता देण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 26/Nov/2024














