महाराष्ट्रातील आदर्श आचारसंहिता संपुष्टात

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाची अधिसूचना, विजयी झालेल्या सदस्यांची नावे आणि राजपत्राची प्रत रविवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही कागदपत्रे सोपविली. त्यासोबतच राज्यात लागू असलेली निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आली आहे. तसेच, आता राज्यपालांकडून औपचारिकपणे नव्या सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल. नियमानुसार आता राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला पाचारण करून बहुमतासाठी आवश्यक पाठिंब्याची खातरजमा करत सरकार स्थापनेचे निमंत्रण देऊ शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 26-11-2024