देवरूख येथील करिश्मा व सानिया मुंगळे यांना मलेशियातील इंडिया इंटरनॅशनल groove festival नृत्य स्पर्धेत यश

देवरूख : मलेशिया येथे झालेल्या इंडिया इंटरनॅशनल groove festival या नामांकित डान्स स्पर्धेत देवरूखच्या शिल्पा मुंगळे यांच्या दोन्ही सुकन्या करिश्मा व सानिया यांनी यश मिळवले आहे. या स्पर्धेत १४६ देश, विदेशातून स्पर्धकांचा सहभाग होता. त्यामध्ये सुपर मॉम कॅटेगरी मध्ये शिल्पा मुंगळे यांना कंसोलेशन बक्षीस मिळवले. ड्वेट कॅटेगरीमध्ये कश्मिरा आणि सानिया यांना प्रथम क्रमांक मिळाला. प्रत्येक कॅटेगरीमध्ये ४० स्पर्धक होते. नृत्य प्रशिक्षक शिल्पा मुंगळे व त्यांच्या कन्या कश्मिरा व सानिया मुंगळे यांचे देवरुखमधून अभिनंदन होत आहे. शिल्पा मुंगळे या गेली २५ वर्षे कथ्थक विषयाचे धडे शिकवत आहे. त्यांनी अनेक कथ्थक नृत्याच्या नृत्यांगना तयार केल्या आहेत. स्वतः कथ्थक विशारद असून त्यांनी आपल्या दोन्ही मुलींनाही या कला प्रकाराचे ज्ञान दिले आहे. विविध कार्यक्रमात शिल्पा मुंगळे यांनी आजवर आपली कला सादर केली आहे. विविध स्पर्धांमध्ये देखील त्यांनी व त्यांच्या शिष्यांनी बक्षिसे प्राप्त केली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 26/Nov/2024