चिपळूण : रत्नागिरी जिल्हा संविधान सन्मान समितीतर्फे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रत्नागिरीत संविधान सन्मान रॅली आणि सभेचे आयोजन केले आहे.
ही रॅली आज (ता. २६) सकाळी ८ वाजता रत्नागिरीचे प्रांताधिकारी, तसेच पोलिस अधीक्षकांच्या हस्ते रत्नागिरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू होवून आंबेडकर पुतळा येथे मेळावा झाल्यानंतर रॅली पुढे सकाळी ८.३० ला गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात जाईल. तिथे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्राध्यापक व विद्यार्थी रॅलीचे स्वागत करतील. तिथे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुढे ती रॅली नवनिर्माण कॉलेज येथे ९.१५ ला पोहोचेल. तिथे संस्थाध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, प्राचार्य, प्राध्यापक रॅलीचे स्वागत करणार आहेत. तिथून लोवले संगमेश्वर येथील नवनिर्माण नर्सिंग कॉलेज आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ११ ला पोहोचेल. प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी रॅलीचे स्वागत करतील. ही रॅली पैसाफंड हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये १२.३० ला पोहोचेल. दुपारी २.१० मिनिटांनी सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या गोविंदराव निकम हायस्कूल, ज्युनिअर व सीनिअर कॉलेजमध्ये रॅली जाणार आहे. तिथे रॅलीचे स्वागत होईल. दुपारी ३.३० ला छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, कामथे येथे पोहोचेल. चिपळूण शहरात पोलिस कार्यालय, भोगाळे, चिंचनाकामार्गे सायंकाळी ५ ला रॅली चिपळूणमधील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ येईल. तेथे प्रांताधिकारी, तहसीलदार, चिपळूण मुख्याधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, महिला मंडळे, विविध संस्था व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीचे स्वागत करतील. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सायंकाळी ६ ला संविधान सभेला सुरवात होईल. त्या वेळी पुणे येथील संविधान अभ्यासक संदीप बर्वे व प्रा. नीलम पंडित हे प्रमुख वक्ते मार्गदर्शन करतील. या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन संविधान सन्मान समितीतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 26-11-2024














