देवरूख : मुंबई येथे होणाऱ्या सुगम गायन अंतिम स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील गिरीराज लिंगायतची निवड झाली आहे.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आणि संस्कार भारती दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धा २०२४ ही स्पर्धा आणि मुंबई बाहेरील सर्व राज्यातील विद्यापीठाच्या ज्युनियर आणि सीनियर कॉलेज तसेच विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी श्रीराम बलवर्धक जालगाव दापोली येथे झाली. या स्पर्धेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी अभ्यंकर कुलकर्णी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी व धामणी गावचा रहिवासी गिरीराज लिंगायत हा प्रथम आला आहे. या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात मुंबई येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. याबद्दल त्याचे धामणी पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 26/Nov/2024














