राजापूर : लांबलेल्या पावसामुळे तालुक्याला यावर्षी पाणीटंचाईची झळ उशिरा पोहोचण्याची शक्यता असली, तरी एप्रिल मे महिन्यामध्ये पाणीटंचाई भासणार नाही, असे नाही. त्यामुळे या संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान दहा यानुसार तालुक्यामध्ये एक हजाराहून अधिक वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाचे पडणारे पाणी अडवून ती मुरविण्याच्या दृष्टीने फारसे प्रयत्न केले जात नसल्याने तालुक्याला दरवर्षी एप्रिल महिन्यापासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. प्रत्येक ग्रा. पं. मध्ये किमान दहा यानुसार तालुक्यातील १०१ ग्रा. पं. मध्ये तब्बल १ हजाराहून अधिक बंधारे बांधण्यात येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 26/Nov/2024














