Breaking : लवकरच उबाठा मध्ये होणार मोठा भूकंप; जिल्ह्यातील अनेक दिग्गजांचा होणार शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी : निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून बीजेपी मधून ठाकरे गटात आलेल्या बाळ मानेंना कुणलाही विश्वासात न घेता देण्यात आलेली उमेदवारी; यामुळे नाराज असलेल्या अनेकांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केलाय. आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. शिवसेनेचे उदय सामंत पाचव्यांदा आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत. निवडणुकीच्या काळात सामंतांनी दिलेले धक्के कमी कि काय आता पुन्हा एकदा मोठा भूकंप करण्याच्या तयारीत उदय सामंत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. येत्या काही दिवसात शिवसेनेचे जिल्हाभरातील अनेक दिग्गज ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभे सोबतच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदी सगळीकडेच शिवसेना मजबूत करण्यासाठी हि महाभरती आयोजित केली जाणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे.