रत्नागिरी : महायुतीच्या उमेदवारांच्या विजयामध्ये भाजप युवामोर्चाचा सिंहाचा वाटा : डॉ. ऋषिकेश केळकर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या विजयामध्ये भारतीय युवा मोर्चाचा महत्त्वाचा वाटा आहे, असे भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात भाजप युवा मोर्चा डॉ. ऋषिकेश केळकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदय सामंत, राजापूरचे किरण सामंत आणि चिपळूणचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारासाठी युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध फळणीकर, जिल्हा सरचिटणीस स्वप्नील गोठणकर, उपाध्यक्ष अभिषेक शिंदे, श्रेयस सावंतदेसाई, अभय शेवडे तसेच जिल्ह्यातील युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष, विधानसभा क्षेत्रप्रमुख देखील सक्रिय होते. युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांनी भाजयुमो पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. विशेष करून राजापूर मतदारसंघाच्या अगदी दुर्गम भागातदेखील किरण सामंत यांच्या विजयासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावत भाजपचे प्रतिनिधी म्हणून भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी प्रचार व नियोजन केले. निवडणूक काळात तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी एकूण ३० पेक्षा जास्त कार्यक्रम/बैठका घेतल्या. भाजप युवा मोर्चाच्या या मेहनतीची दखल कोकणचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण तसेच रत्नागिरी दक्षिणमधील विजयी उमेदवार मंत्री उदय सामंत, किरण सामंत व शेखर निकम आदींनी घेतली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महायुतीचे कोकणातील प्रमुख समन्वयक म्हणून भूमिका बजावणारे, रत्नागिरी जिल्हा युवा मोर्चाचे आधारस्तंभ अनिकेत पटवर्धन यांच्या सहकार्याने युवा मोर्चा ही जबाबदारी पार पडू शकला, असे डॉ. केळकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 26-11-2024